कंधारच्या जगतुंग तलावात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

कंधारच्या जगतुंग तलावात पाच जणांचा बुडून मृत्यू

कंधार : दर्गादर्शनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा नवरंगपुरा शिवारातील जगतुंग तलावात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी घडलीÞ मयतात दोन युवकासह तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून नांदेड शहरातील देगलूरनाका भागातील रहिवाशी आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मागील महिन्याभरात राज्यासह नांदेड जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच धरणे तलाव जलाशय हे देखील तुडूंब भरले आहेत. याच पद्धतीने कंधार शहरात नवरंगपुरा शिवारात तुडूंब भरलेल्या जगतुंग तलावाने पाच भाविकांना रविवारी बळी घेतला. नांदेडच्या देगलूर नाका भागातील रहिवाशी असलेले भाविक आपल्या कुटंूबासह कंधारच्या हाजी सयाह दर्गा दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर सर्वजण दुपारी तीनच्या सुमारास नवरंगपुरा येथील जगतुंग तलावाजवळ जेवण्यासाठी बसले. यातील एक अल्पवयीन युवक हात धुण्यासाठी गेला आणि तोल जाऊन तलावातÞ त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातील अन्य युवकासह अन्य दोन मोठ्या सदस्यांनी तलावात उडी घेतली.

मात्र गाळ आणि जास्त पाण्यामुळे पाचही जणांचा बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. मयतात मोहम्मद विखार अब्दुल गफार वय ३० वर्षे, मोहम्मद शफीयोद्दीन मोहम्मद गफार वय ४५, मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन वय १५, सय्यद सोहेल सय्यद वाहिद वय २०, सय्यद नवीद सय्यद वाहिद वय १५ राहणार सर्व गणीपुरा देगलूर नाका, नांदेड यांचा समावेश आहे. यातील दोन जण सख्खे भाऊ व तीन जण चुलते असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भोई समाजातील व्यक्तींच्या मदतीने पाचही मृतदेह तलावातून बाहेर काढून कंधारच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी या घटनेची माहिती घेऊन पोलिसांना व अधिका-यांना योग्य ती मदत करण्याच्या सुचना दिल्या. तर शेकापचे विक्रांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या घटनेमुळे कंधार शहरासह देगलूर नाका भागात शोककळा पसरली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: