हिंदू असल्याची लाज वाटत, या अभिनेत्रींच्या ट्विटने उडाली खळबळ !

 

देशातील विविध मुद्द्यावर चित्रपट सृष्ठीतीलं कलाकार आपला परखड मत मांडताना दिसून आले आहे. मात्र आपले मत मांडताना सामाजिक भान कुठेतरी विसरताना दिसून येत आहे अशाच कलाकारांच्या यादीत येणाऱ्या एका अभिनेत्रीनं तिच्या एका ट्विटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

एक हिंदू असल्याची लाज वाटते…. असं म्हणणारी अभनेत्री आहे स्वरा भास्कर जी आपल्या पारखड मतांसाठी ओळखली जाते . स्वरानं एक व्हिडीओ रिट्विट केला आहे. जिथं लोकांचा एक घोळका ‘जय श्री राम’चे नारे चढ्या स्वरात बोलताना दिसत आहेत. याच व्हिडीओला अनुसरून तिनं आपल्या हिंदू असल्याची लाज वाटत असल्याचं स्पष्ट केलं. यावरुन तिची बरीच खिल्ली उडवली जात आहे, तर चाहत्यांची एक फळी स्वराच्या बचावासाठी धावून आली आहे.

नमाज वाचणाऱ्यांसमोर दिले जाणारे जय श्रीरामचे नारे पाहून स्वराचा संताप अनावर झाला आहे. हे पाहूनच तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीतील गुरुग्राममधील सेक्टर 12 – A येथे खासगी भूखंडावर मुस्लिम समुदायातील काही लोक नमाज अदा करत होते. त्याचवेळी तेथे जमाव आला आणि तिथे त्यांनी राम नामाची नारेबाजी सुरु केली. ज्यनंतर या नजीकच्या भागात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

Team Global News Marathi: