फडणवीसजी, लूज बॉलवरच मोठी विकेट जाते, हे लक्षात ठेवावे – संजय राऊत

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरण, परमवीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरण, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण अशा विविध मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच “सळो की पळो” करून सोडले होते. त्यात विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती.

याच मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राजकारणात कुणावरही इतका विश्वास टाकायचा नसतो, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला. ते आज नवी दिल्ली येथे पाटकर माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एकदा हात पोळूनही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो.

तसेच खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावे, असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला.

Team Global News Marathi: