दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा कराल तर मोठ्या प्रमाणात दुःखच पदरी पडेल त्यासाठी..

सुख म्हणजे नक्की काय असतं?

Sonal Kolhe-Patare

खरंच सुख म्हणजे नक्की काय असत? ज्याच्या शोधात मनुष्य जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत चा प्रवास खर्च करतो ते सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख आणि दुःख हा तर भावनांचा खेळ आहे. या तर फक्त मनाच्या स्थिती आहे. आपला मन म्हणजे अनेक भावनारूपी नद्यांचा संगम आहे. सुख, दुःख ,राग, क्रोध, मत्सर, आनंद ,लोभ ,आशा, उत्सुकता अशा अनेक भावनांचा संगम म्हणजे आपला मन.

“मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !”

या ओळीं खरंच विचार करायला भाग पडणाऱ्या आहेत. खरंच काय केल म्हणजे आयुष्य सुखी होऊन जाईल?या प्रश्नाचा उत्तर मला सापडलय!!! आणि तेच मला तूमच्या सोबत share करायचा आहे!

सुखी राहण्याचे काही मार्गच आहेत.
ते म्हणजे..

✓ परिस्थितीला हाताळायला शिका – जीवन रुपी वाटेवर अनेक वळणे येतील काही काटयांनी भरलेली तर काही फुलांनी सजवलेली ! माझी आई नेहमी म्हणते असा कोणताच Problem असा नाही आहे की ज्यावर solution नाही ! कीतीही कठीण परिस्थिती असली तरी त्यावर मार्ग हा नक्की असतो. फक्त तो शोधण्यासाठी लागत ते धैर्य आणि संयम.

“लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।“

शांत रहा ,प्रयत्न वादी रहा मार्ग नक्कीच सापडेल!

✓Be selective : कमी महत्वाच्या आणि मनाची शांतता बिघडवणाऱ्या गोष्टी आणि व्यक्तींना टाळायला शिका.Negetive गोष्टी आणि negetive व्यक्ती या पासून दूर राहणे जर आपल्याला जमवता आले तर आपण नक्कीच सुखी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो.या सोबतच positive वाचन , positive व्यक्ती, Positive Communication आपला दिवस आणि जीवन सुखी-आनंदी बनवू शकतात.

✓नात्यामधील गोडवा: सुखी राहण्यासाठी आपल्या सभोवतालची आणि आपल्या माणसांसोबत चांगल Healthy नातं ठेवणं खरोखरच खुप सुख देऊन जात. खर तर नाती जपणे याला मी एक कला म्हणेल! ती जर एकदा तुम्हाला अवगत झाली तर बघा प्रत्येक नातं खुप सुंदर होऊन जाईल आणि परिणामाने आयुष्य ही!! त्या साठी सगळ्यात महत्वाचं आहे नात्यामध्ये सुसंवाद हवा. आणि सोबतच वाद टाळायला शिका. त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडन कमीत कमी अपेक्षा ठेवणं आणि स्वतः कडन जास्तीत जास्त अपेक्षा ठेवायला हवी.

✓समारोच्या व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जादू पहा तुम्ही ही आनंदी होऊन जाल.

✓’माफ’ करायला शिका : जरी आपल्या व्यक्तीकडन काही चूक झाली तर माफ करायला शिका .कारण त्याच समाधान हे क्रोध आणि मत्सर च्या भावनेपेक्षा खुप पटीने सुखदायी असते.

✓समाधानी आणि आशावादी राहा: जे मिळालं आहे त्या मध्ये समाधान मानता यायला हव आणि जे नाही मिळालं त्या साठी दुःखी होऊन न बसता आशावादी होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा कारायला हवी.

✓आनंदी राहा ,हसत राहा : सुखी राहण्याच हे रहस्य आहे! परिस्थिती कशी ही असू देत आपल्या चेहऱ्यावर smile हवी. जर आपण स्वतः खंबीर असू तर कोणतीही लाट आपल्याला उध्वस्त करू शकत नाही .

✓स्वतः वर प्रेम करा:. तुम्हाला सुखी ठेवण्या ची सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे.

”No one Will Do It for you”

तूम्ही दूसऱ्या कडन सुखाची अपेक्षा करण्या पेक्षा स्वतः ती जबाबदारी उचला.

✓आनंदी रहा! : कीती ही वादळ आल..संकटे आली तरीही स्वतः वर प्रेम करा . ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो असे छंद जोपासा… हाच सूखाचा कानमंत्र आहे .

स्वतः वर प्रेम करा आणि आनंदी राहा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: