पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना सायकलचे वाटप

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना सायकलचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात विविध सामाजिक उपक्रम वाढदिवसज साजरा करण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून दक्षिणमध्य मुंबई जिल्ह्या मधील ६ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी ७० दिव्यांग नागरिकांना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले होते.

या उपक्रमाला भाजपचे मुंबई जिल्हा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर आधी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी उपस्थित नागरिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांचे शाल देऊन आभार मानले. आजवर आमदार लाड यांनी अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेला धावून गेले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: