संरक्षण खात्याच्या कंत्राटदाराकडून राम मंदिरासाठी १५ कोटीची देणगी

संरक्षण खात्याकडून हातबॉम्ब पुरवठय़ाचे ४०९ कोटींचे कंत्राट दिलेल्या नागपुरातील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लि. या कंपनीचे प्रमुख सत्यनारायण नुवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामासाठी तब्बल १५ कोटीची देणगी ट्रस्टला दिलेली आहे. आता पर्यंत ही सर्वात मोठी देणगी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मात्र या देणगीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लि. या कंपनीला काही दिवसांपूर्वीच ते कंत्राट देण्यात आले होते. यावर आयुध निर्माणी मंडळाचे अधिकारी व कामगार संघटनांनी आक्षेप घेतला होते.

मेक इन इंडियाच्या नावाखाली भाजपा संघ परिवाराशी निगडित कंपनीला कंत्राट देत आहे. आसा आरोप त्यांनी लगावला होता. मात्र हे आरोप फेटाळण्यात आले असून नियमानुसारच कंत्राट देण्यात आल्याचे बोलून दाखवले आहे. यापैकी पाच कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी निधी संकलन समितीकडे दिला आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे.

Team Global News Marathi: