सहजपणे मिळू शकतो हरवलेल्या अँड्रॉईड फोनचा डेटा, करावं लागेल हे सोपं काम..

सहजपणे मिळू शकतो हरवलेल्या अँड्रॉईड फोनचा डेटा, करावं लागेल हे सोपं काम..

 

ग्लोबल न्यूज:फोन हरवल्यास, फोनमध्ये असणारा डेटा धोक्यात येऊ शकतो. पण फोन चोरी झाला तर त्या फोनचा डेटा सहजपणे पुन्हा मिळवता येऊ शकतो. हे कसं जाणून घ्या…

*फाइंड माय डिव्हाईस*
फोन चोरी झाल्यास, तुमचा स्मार्टफोन ट्रॅक करणं, रिंग करणं, लॉक करणं किंवा इरेज करणं अशा गोष्टी या फीचरच्या मदतीने केल्या जाऊ शकतात. हे फीचर युजरला सेटिंग टॅबमध्ये मिळतं.

*ब्लूटूथ ट्रॅकर, स्मार्ट स्पीकर*
ब्लूटूथ ट्रॅकर तुमचा फोन हरवल्यानंतर तो ट्रॅक करण्याचा आणखी एक पर्याय आहे. परंतु हे एका मर्यादित वेळेतच काम करतं. एकदा ब्लूटूथ ट्रॅकर खरेदी केल्यानंतर ते फोनशी कनेक्ट करावं लागतं. ट्रॅकरद्वारे फोनवर अलार्म सक्रिय होईल.

*लॉक स्क्रिन मेसेज*
फोन चोरी झाल्यास, लॉक स्क्रिन मेसेज सेट करता येतो. पासवर्डशिवाय कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकत नाही. त्यामुळे लोकांना हे सांगण्यासाठी मेसेज सेट करू शकता, की तुम्ही डिव्हाईसचा शोध घेत आहात.

*अकाउंट सुरक्षा*
फोनमध्ये अनेक सोशल मीडिया, ईमेल आणि इतर अकाउंट्स लॉग-इन असतात. त्यामुळे डेटा सुरक्षेसाठी हे अकाउंट लॉग-आउट करणं गरजेचं आहे. फाइंड माय डिव्हाईसचा वापर करुन हा पर्याय निवडता येतो.

*चोरी रिपोर्ट*
भारतात कोणताही फोन चोरी झाल्यानंतर त्याबाबत रिपोर्ट करणं FIR दाखल करणं गरजेचं असतं. ऑनलाईन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून तक्रार करता येते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: