‘दारू, चरस, गांजा’च्या नशेला ठरतोय कंडोम पर्याय; पश्चिम बंगालमध्ये मोठा तुटवडा!

 

आजवर आपण आपल्या आजूबाजूला अनेक घटना आपण ऐकतो. यातील बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगार हा नक्कीच कोणत्या ना कोणत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाखाली असतो. आजच्या काळात बाजारात अशी अनेक रासायनिक उत्पादने आहेत ज्यातून लोक नशा करत आहेत. रंग, कफ सिरप, पेट्रोल, टायर पंक्चर ट्यूब, नेलपॉलिश यांचाही नशेत वापर केला जातो. नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे.

मात्र तुम्हाला ही विचित्र वाटेल, पण पश्चिम बंगालमधील तरुण कंडोमपासून नशा करीत आहेत, तुम्हाला विश्वास बसणार नाही… पण, हे सत्य आहे. पश्चिम बंगालमध्ये कंडोमची विक्री अचानक वाढल्याने बाजारातून कंडोम संपले आहेत. फ्लेवर्ड कंडोमच्या मागणीत त्यामुळे प्रचंड वाढ होऊन कंडोम पासून नशा होत असल्याचे जाणून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. जाणून घ्या, तरुणाई कंडोमची नशा कशी करतात.

पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील तरुणांमध्ये कंडोमचे व्यसन खूप लोकप्रिय झाले आहे. ते बाजारातून फ्लेवर्ड कंडोम घेतात आणि गरम पाण्यात तासभर भिजत ठेवतात. एक तासानंतर, ते पाणी पितात, ज्याची नशा सुमारे 10 ते 12 तास टिकते. वास्तविक, दुर्गापूरमध्ये अनेक विद्यार्थी राहतात जे घरापासून दूर वसतिगृहात राहतात.

वसतिगृहात राहून त्यांना सिगारेट, दारू अशा अनेक प्रकारच्या नशेचे व्यसन लागले आहे. अल्कोहोल आणि इतर नशा कंडोमपेक्षा खूप महाग आहेत. ते त्यांच्या खिशातून सहज कंडोम काढू शकतात आणि ते घेण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही गरज नसते. परिणामी विद्यार्थी फ्लेवर्ड कंडोमची नशा करत आहेत.

Team Global News Marathi: