स्त्रियांप्रमाणे नटतो आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवत नाही…; इंजिनिअर पतीविरोधात पत्नीची कोर्टात धाव

स्त्रियांप्रमाणे नटतो आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवत नाही…; पतीविरोधात पत्नीची कोर्टात धाव

इंदूर : नवरा बायकोमधील विचित्र भांडणं तुम्ही यापूर्वी ऐकली असतील किंवा वाचली असतील. असंच एक विचित्र प्रकरणं  मध्य प्रदेशच्या इंदूरमधून समोर आलं आहे. मुख्य म्हणजे यावरून पत्नीने आपल्या पतीविरोधात थेट कोर्टामध्ये धाव घेतली. याचं कारणही फारचं विक्षिप्त आहे.

पीडितेने यादरम्यान पोलिसांना सांगितलं की, पती लग्नानंतर नेहमीच दूर दूर राहत होता. लग्नानंतर कधीच ते जवळ आले नाही. जेव्हाही ती पतीच्या जवळ जात होती तेव्हा पती वेगळ्या रूममध्ये जात होता. दरम्यान पीडितेला पतीवर संशय आला आणि ती पतीवर सतत नजर ठेवत होती. अशात पत्नीला पतीबाबत जे समजलं त्यामुळे ती हैराण झाली.

इंदूरमध्ये पत्नीने आपल्या पतीविरोधात याचिका दाखल केलीये. पत्नीने केलेल्या आरोपांनुसार, तिचा पती हा संध्याकाळनंतर स्त्रियांसारखा तयारी करून सजतो. इतकंच नाही तर आपल्यासोबत प्रेम संबंध ठेवत नाही, अशी तक्रार पत्नीने केलीये. शिवाय रात्री दुसऱ्या खोलीत जाऊन झोपतो.

पतीचं असं विचित्र वागत असल्याने या महिलेने कोर्टात धाव घेतलीये. रात्री झोपण्याआधी तो स्त्रियांप्रमाणे शृंगार करतो आणि या पतीविरोधात पत्नीने तक्रार केलीय. दरम्यान जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणीही असून कोर्टाने पतीला फटकारलंय. यानंतर पीडित पत्नीला भत्ता देण्याचे आदेश जिल्हा कोर्टाने दिलेत.

पत्नीची नेमकी काय तक्रार?

टिकली, लिपस्टिक आणि कानातले घालून या महिलेचा पती शृंगार करायचा आणि महिलेचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला गेलाय. हे सगळं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर या पतीला अटक करण्यात आली आणि त्याला कोठडी सुनावण्यात आली होती.

आता या संपूर्ण प्रकरणी पीडितेला दिलासा देत कोर्टानं पतीला चांगलंच सुनावलंय. तसंच पीडितेला दरमहा 30 हजार रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. मार्च 2021 पासूनचे थकलेले पैसे विक्षिप्त पतीला द्यावे लागतील, असं म्हणत पीडितेच्या बाजूने निकाल दिलाय.

हे अफेअर दोन वर्षे चालले, नंतर लग्न झाले
महिलेने सांगितले की, लग्नापूर्वी दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी सुरुवातीला विरोध केला कारण ते वेगवेगळ्या जातीचे होते. पुढे लग्न झाले. लग्नानंतर मी माझ्या पतीसोबत पुण्याला राहायला गेले. तेथे गेल्यावर कळले की पती काही तरुणांसोबत राहतो. या समूहातील सर्व लोक महिलांसारखे राहतात. संध्याकाळ पडताच नवरा कपाळावर बिंदी, केसांची बँड, कानातले आणि ओठांवर लिपस्टिक लावून सजवतो. मला सोडून दुसऱ्या खोलीत जाऊन तो एकटाच झोपतो. हे घरच्यांना सांगितले, त्यामुळे नातेवाइकांनी इंदूरला येण्यास सांगितले.

 पती पुण्यात राहण्याचा हट्ट करत होता. एक दिवस मेकअप केल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि माझ्या गुप्तांगाला दुखापत झाली. पतीने पुण्यात किरकोळ गरजांसाठी पैशांची मागणी सुरू केली. पती-पत्नीसारखे नाते त्यांच्यात नव्हते. 2020 मध्ये, त्याने आपल्या बहिणीच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत इंदूरला पत्नीकडे सोडले. पत्नीने वकिलांच्या माध्यमातून काही पुरावेही न्यायालयासमोर सादर केले. महिला व बालविकास विभागाने ही तपासणी केली. हा तपास अहवालही न्यायालयात सादर करण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: