डी कंपनी चालविण्यासाठी दाऊदनं पठाण मुलीशी केला निकाह

 

दाऊदने डी कंपनी चालवण्यासाठी स्वतःचे नेटवर्क तयार केले असून सांकेतिक भाषा आणि सहजासहजी उलगडता येणार नाही, अशा कोडवर्डचा वापर करून तो व्हॉइस मेसेज पाठवत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मिळवली आहे. दाऊदने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातील आपला पत्ता बदलला असून सध्या तो कराचीत पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यातील जागेत राहत असल्याचा सुगावाही यंत्रणांना याच चौकशीत लागला आहे.

याच काळात दाऊदने पाकिस्तानातील एका पठाण युवतीशी दुसरा निकाह केल्याची माहिती त्याने दिली. दुसरा निकाह करण्यासाठी दाऊदने पहिली पत्नी मेहजबीन हिला तलाक दिल्याचे सांगितले जात होते. पण त्यात तथ्य नाही. ती जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा होती. उलट मेहजबीन दाऊदच्या वतीने भारतातील नातलगांच्या संपर्कात असल्याची माहिती दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह इब्राहीम पारकर याने एनआयएच्या चौकशीदरम्यान दिली.

अर्थात, दाऊदने पाकिस्तानातील एका पठाण युवतीशी दुसरा निकाह केल्याची माहिती खरी असल्याचे त्याने सांगितले. गेल्या वर्षी जुलैत मेहजबीनला दुबईत भेटलो, तेव्हा तिनेच ही माहिती दिल्याचे तो म्हणाला. सण-वार आणि अन्य कारणांसाठी सध्या तीच दाऊदच्या नातलगांच्या, मित्र परिवाराच्या संपर्कात असल्याचे अली शाहने चौकशीत कबूल केले. आरिफ भाईजान त्याचा सांकेतिक भाषेतील आणि कोडवर्डचा वापर केलेला व्हॉइस मेसेज (एन्क्रिप्टेड व्हॉइस मेसेज) रेकॉर्ड करतो. तो उघडण्यासाठीही पासवर्ड असतो.

सदर मेसेज तो शब्बीर शेखला पाठवतो. शब्बीर शेख तो दुबईतील मध्यस्थ किंवा दाऊदचे व्यवहार सांभाळणाऱ्या जैदला पाठवतो. जैद आपल्या दुबईतील नंबरचा वापर करून तो मेसेज कराचीत छोटा शकीलला पाठवतो. तो मेसेज छोटा शकील दाऊदला सांगतो.

 

Team Global News Marathi: