केंद्राने देशाची माफी मागणी अन्यथा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – पी. चिदंबरम

काही दिवसांपूर्वी विविध देशातील वृत्तसमूहांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधत सर्वस्वी केंद्राला जबाबदार धरले होते. आता त्या पाठोपाठ जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारचे वाभाडे काढले होते. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आक्रमक प्रवित्र घेत थोडी जरी लाज शिल्लक असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

पी. चिदंबरम यांनी दोन ट्विट करून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच आजच्या लॅन्सेटच्या अग्रलेखानंतर थोडी जरी लाज बाकी असेल तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्याने अर्थात हर्ष वर्धन यांनी जबाबदारी स्वीकारून त्वरीत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे. कोरोनाच्या संसर्गाशी लढण्याचे काम एका मजबूत टीमवर आणि पंतप्रधानांवर सोडून द्यावे. आरोग्य मंत्री आणि डॉक्टर, सल्लागारांच्या टीमला त्यात स्थान देऊ नये असे सुद्धा त्यांनी म्हंटले होते.

लॅन्सेटने काय लिहिलं?
लॅन्सेटच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, आज भारतात ४ मे रोजी २ कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दररोज भारतात साधारणतः ३ लाख ७८ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे २ लाख २२ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. रुग्णालयं भरली आहेत आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झालाय, असं लॅन्सेटच्या अग्रलेखात म्हटलं आहे या अग्रलेखानंतर विरोधकांनी टीकेचे बाण मोदी सरकारवर सोडले होते.

Team Global News Marathi: