सोलापुरात बनावट नोटा बनवण्याचा अड्डा उध्वस्त….

सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापुरात बनावट नोटा तयार करणारा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला असून या प्रकरणी दोन ताब्यात घेण्यात आलं आहे. संजय धनु पवार व विष्णू सिद्राम गायधनकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत शंभर रुपयांच्या ६१० आणि पाचशे रुपयाच्या १०० नोटा अशा एकूण १ हजार ११० बनावट नोटा कारवाई दरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देखील विजापूर नाका पोलिसांनी कारवाई जप्त केलं आहे.

एक व्यक्ती बनावट नोटा खऱ्या भासवून वितरीत करीत आहे. विजापूर नाका पोलीस स्थानकाचे पोलीस आसरा चौक या ठिकाणी पोहोचले असता एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचं निदर्शनास आलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव संजय पवार असल्याचे सांगितले. तर सदरच्या बनावट नोटा ह्या विष्णु सिद्राम गायधनकर यानी कमशिनवर वितरीत करत असल्याचे कबूल केले. त्याच्या माहितीच्या आधारवर पोलिसांनी सोलापुरातील भारत हौसिंग सोसायटी धाड घातली.

भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाही ! त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का? – खासदार इम्तियाज जलील

या ठिकाणी पोलिसांना शंभर रुपये दराच्या ६१० नोटा, पाचशे रुपयाच्या १०० नोटा, बनावट नोटा छापण्याकरीता लागणारे कलर प्रिंटर, शाईच्या बाटल्या, पेपर कटर वगैरे असे एकून १ लाख २१ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात भांदवि ४८९, १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: