मर्सिडीज इंजिनचा स्फोट होऊन उपचारदरम्यान नगरसेवक तपनभाई पटेल यांचा मृत्यू

मर्सिडीज इंजिनचा स्फोट होऊन उपचारदरम्यान नगरसेवक तापनभाई पटेल यांचा मृत्यू

शिरपूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती तपनभाई पटेल यांचे बुधवारी मध्यरात्री सुमारे १:०० च्या दरम्यान निधन झाले आहे. शिरपूर निम्स कॅम्पसमधून घरी परत जात असतांना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कारच्या इंजिनचा स्फोट झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तात्काळ त्यांना महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने पालिका रुग्नालयात दाखल करण्यात आले पात्र उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

शिरपूर पालिकेत नगरसेवक म्हणून ते मोठ्या बहुमताने निवडून आले होते. शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र तर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, शिरपूर नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: