भारतात कोरोनामुळे जळणाऱ्या चितेची चीनने उडवली खिल्ली !

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे, तसेच कोरोनामुळे मुर्त्यूचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यातच चीनमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बलशाली आघाडीकडून कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भारताची खिल्ली उडवण्यात आलेली आहे. एकीकडे अध्यक्ष शी जिनपींग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवून सहानुभूती व्यक्त करतात ता दुसरीकडे वेईबो या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून भारताच्या विदारक स्थितीची खिल्ली उडवण्यात आलेली आहे.

भारतामधील स्मशानभूमीतील सामुहिक अंत्यसंस्काराचे छायाचित्र त्यासाठी वापरण्यात आले. त्याच्या बाजूला चीनने गेल्या आठवड्यात सोडलेल्या प्रक्षेपकाचे छायाचित्र जोडण्यात आले. त्यास देण्यात आलेल्या ओळी भारतावर उद्भवलेल्या संकटाची खिल्ली उडवणाऱ्या आहेत. जेव्हा चीन एखादी गोष्ट प्रज्वलित करतो विरुद्ध भारत जेव्हा असे करतो असे त्याखाली नमूद करण्यात आले होते.

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाकडून त्यांच्या वेईबो अकाऊंटवर शनिवारी ही पोस्ट टाकण्यात आली. नंतर ती हटविण्यात आली. भारतामधील कोरोनाच्या जागतिक साथीबाबत चिंता वाटते, असे जीनपिंग यांनी शुक्रवारी मोदी यांना कळविले होते. चीनने गेल्या महिन्यात भारताला वैद्यकीय साहित्याची मदतही केली होती. ही पोस्ट काही वेळात व्हायरल झाली. चीनमधील ऑनलाइन जगताचे वार्तांकन करणाऱ्या चायना डिजिटल टाईम्सनुसार चायनीज पोलिस ऑनलाइन, तियानजीन महापालिका सरकारी वकील कार्यालय अशा संस्थांच्या अधिकृत अकाउंटवरूनही खिल्ली उडविण्यात आली.

Team Global News Marathi: