अनेक देशामध्ये कोरोनाचे अजूनही कोरोनाचे भय,जागतिक आरोग्य संघटना चिंतेत !

 

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरतोय. फ्रान्सनंतर अमेरिकेतही कोरोनाची पाचवी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांनंतर या देशांतील बहुतेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढतेय. यात उत्तरेकडील आणि पर्वतीय प्रदेशांत सर्वाधिक रुग्ण आहेत. जॉन हाफकिंस युनिर्व्हसिटीच्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात २९ प्रांतांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आधीच्या आठवड्यापेक्षा जास्त होती. एक महिन्यापूर्वी, केवळ १२ प्रांतांमध्ये प्रकरणे वाढत होती.

यावर तज्ञांनी सांगितले की, २३ प्रांतातील रुग्णालयांमध्ये आठवड्याभरापूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तज्ज्ञांकडून या वाढत्या रुग्णसंख्येमागे अनेक कारणं सांगितली जात आहे. यामध्ये विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल हवामान, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि लसीकरण न केलेले लोक यांचा समावेश होतो. मात्र अमेरिकेत कोरोनाचे संकट सध्यातरी कायम राहणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

जिनिव्हा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेच प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी शुक्रवारी युरोपमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, युरोपात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाची सुमारे २० लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर २७ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लसीकरणाचे उद्दिष्ट गाठलेल्या किंवा अगदी जवळ असलेल्या देशांमध्येही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय.

Team Global News Marathi: