काँग्रेसचे गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त, पंतप्रधानांना भावना अनावर, अश्रु अनावर

काँग्रेसचे गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त, पंतप्रधानांना भावना अनावर, अश्रु अनावर

 

ग्लोबल न्यूज: 30 जुलै 2007 मध्ये जम्मू आणि कश्मीरमध्ये भाविकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं सारा देश हादरला होता. या हल्ल्यावेळी गुलाम नबी आझाद हे जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. हल्ल्यानंतर गुजरातमधील नागरिकांना विमानाने परत पाठवताना ते स्वत: विमानतळावर उपस्थित होते.

 

 

 

मृतांचे पार्थिव, त्यांचे कुटुंबीय यांची व्यवस्था करण्यासाठी ते जातीनं लक्ष घालत होते. त्यांना सर्व ती मदत करतानाच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फोन करून स्वत: ही माहिती दिली आणि खेद व्यक्त केला. याच प्रसंगाची आठवण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दहशतवादी हल्ल्याचा प्रसंग घडला तेव्हा गुलाम नबी आझाद यांचे अश्रू थांबत नव्हते, त्यांच्यासारखा नेता सभागृहातून निवृत्त होत असल्याचे सांगत मोदीही रडू लागले. संपूर्ण सभागृह भावूक झाले.

तो दहशतवादी हल्ला झाला त्यावेळची दृश्य ANI या वृत्तसंस्थेने ट्विट केली आहेत. या व्हिडीओ मध्ये गुलाम नबी आझाद भाविकांना भेटून त्यांची विचारपूस करताना दिसतात. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत असल्याचंही पाहायला मिळतं. ते जातीनं सारी व्यवस्था पाहात असल्याचं दिसतं. मृतांची पार्थिव, जखमींवर सुरू असलेले उपचार हे सर्व या व्हिडीओत दिसते. त्यासोबतच भाविकांना पार्थिवांसह विशेष विमानाने परत पाठवताना त्यांनी सर्वांची साश्रू नयनांनी माफी मागितली ते पाहायला मिळते.

 

गुलाम नबी आझाद तेव्हा म्हणाले होते, ‘मी तुम्हाला फुलं-फळं घेऊन पाठवू इच्छित होतो, पण तुमची पार्थिवं पाठवतो आहोत. याचा मला प्रचंड खेद वाटतो. आम्हाला सर्वांना माफ करा.’

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राज्यसभेत संबोधित केले. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांना आज सभागृहातून फेअरवेल देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना भावाश्रू रोखू शकले नाहीत. ( PM Modi Crying )

ग्लोबल न्युज नेटवर्क: