नागरिकांना कोरोनाची लस निवडण्याची देण्यात यावी परवानगी

नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्याचा विचार सरकार करत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय कर्मचारही आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या नकर्मचारी वर्गाला कोरोनाची लस टोचण्याचे काम यददुआ पातळीवर सुरु आहे.

तसेच लसीच्या दुसऱ्या टप्याला सुद्धा १ मार्च पासून सुरवात झालेली आहे. या दुसऱ्या टप्यात ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असणाऱ्यांना लस टोचण्यात येत आहे. मात्र त्यांना लस निवडण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही केंद्रावर गर्दी आणि काही ठिकाणी कमी प्रतिसाद असेही चित्र दिसत आहे. नागरिकांना लस निवडीचे स्वातंत्र्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्ॉक्सिन यादोन कंपनीच्या लशी दिल्या जात आहेत. यातील कोव्हिशिल्ड लसीने तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत, तर कोव्हॅक्सिनच्या अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. लसीची परिणामकता आणि प्रभाव याबाबत अद्यापही साशंकता असल्याने कोव्ॉक्सिन घेण्यास नागरिक फारसे उत्सुक नाहीत.

तर लसीच्या नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या संकेतस्थळावर कोव्हिशिल्ड किंवा कोव्ॉक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची आहे, हे निवडण्याचा पर्याय दिलेला नाही. केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्यावी लागेल असे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

Team Global News Marathi: