मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना ED चा मोठा दणका! ठाण्यातील 11 फ्लॅट्स जप्त

कोण आहेत श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय?

रश्मी ठाकरेंचे भाऊ असलेले श्रीधर पाटणकर नेमके आहेत कोण? जाणून घ्या!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना ED चा मोठा दणका! ठाण्यातील 11 फ्लॅट्स जप्त

 

Who is Rashmi Thackeray Brother: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. 6.45 कोटी रुपयांच्या या मालमत्ता आहेत. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहेत श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय?

 

ठाणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर  (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत (ED attaches immovable assets). 6.45 कोटी रुपयांच्या या मालमत्ता आहेत. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीने थेट मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवरच कारवाई केल्याने मुख्यमंत्र्यांसाठी हा मोठा हादरा असल्याचं सांगितलं जात आहे.

ईडीने आतापर्यंत राज्यात अनेक मालमत्तांवर धाडी मारल्या होत्या. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली आहे. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडीने चौकशीही केली आहे. स्वत: संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीने समन्स बजावलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ईडी आली नव्हती. ईडीकडून मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काय म्हटल आहे ईडी ने

यापूर्वी संचालनालयाने 06.03.2017 रोजी, PMLA, 2002 च्या तरतुदींनुसार, पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती आणि आधीच पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 21.46 कोटी किंमतीच्या महेश पटेल, चंद्रकांत पटेल, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित कंपन्या आहेत. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या मेसर्स पुष्पक रियल्टीचा निधी चोरून नेला होता. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली 20.02 कोटी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना विविध जोडलेल्या/अनकनेक्ट केलेल्या संस्थांद्वारे चोरल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय.

अनेक शेल कंपन्या चालवणारे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी त्यांच्या शेल कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत जास्त असुरक्षित कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे हस्तांतरित केले. मेसर्स श्री साईबाबा गृहनिर्मिरी प्रा.ला 30 कोटी महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने काढून घेतलेले, असेही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

कोण आहेत श्रीधर पाटणकर?

श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत.

रश्मी ठाकरे यांचे ते भाऊ आहेत.

श्रीधर पाटणकर हे डोंबिवलीत राहतात.

श्रीधर पाटणकर हे उद्योजक आहेत.

त्यांचे वडील माधव पाटणकरही उद्योजक होते.

कोणत्या संपत्तीवर टाच?

ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची 6.45 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. निलांबरी प्रकल्पातील या 11 निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत.

प्रकरण काय?

पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत 6 मार्च 2017पासून पुष्पक बुलियन आणि ग्रुप कंपनीजवर मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू आहे. यापूर्वीही ईडीने पुष्पक बुलिनय कंपनीतील महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील 21.46 कोटीची संपत्ती जप्पत केली आहे.

 

राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले होते. श्रीधर पाटणकर यांनी देवस्थानाच्या जमिनी लाटल्या असा आरोप होतोय. पण पाटणकर यांनी देवस्थानची जमीन कशी लाटली व कधी घेतली ते दाखवा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं होतं. जी जमीन दाखवली जाते. ती जमीन त्यांनी ज्यांच्याकडून घेतलीय त्यांचा व देवस्थानाचा काहीच संबंध नाही. त्यांनी 2014मध्ये जमीन कोणत्या व्यक्तींकडून घेतली त्यांच्या नावाची यादीच राऊत यांनी सादर केली होती. या यादीतील बाराव्या क्रमांकाच्या व्यक्तीकडून त्यांची जमीन घेतल्याचेही त्यांनी सांगितले होते.

सोमय्यांचा आरोप

राऊत यांनी आरोप फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 16 फेब्रुवारी रोजी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत. श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे. मी तक्रार दिलेली नाही. मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: