छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तेलंगणात मोठा राडा

 

तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वादाचे प्रकरण समोर आलं आहे. पुतळा बसवण्यावरून दोन गटात दगडफेक झाली. या प्रकरणानंतर परिसरात तणाव निर्माण झाली होती.सध्या परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात राडा झाल्याची माहिती मिळाली आहे.

दोन गटात वाद झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार दगडफेक देखील करण्यात आली. या घटनेत एक हवालदार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. निझामाबादचे पोलिस आयुक्त के.आर.नागराजू संचारबंदीचे आदेश दिले आहेत. परिसरातील तणाव पाहता कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र, याला दुसऱ्या गटाने विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटात आधी शाब्दिक बाचाबाची आणि नंतर मोठं भांडण झालं. घटनास्थळी शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोपींच्या अटकेचं काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Team Global News Marathi: