अखिलेश यादव, आझम खान यांनी खासदारकीचा दिला राजीनामा

 

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. २०१९ मध्ये आझमगडमधून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले होते. यासोबतच समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनीही मंगळवारी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज लोकसभेत पोहोचले. येथे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. राष्ट्रीय राजकारणातून ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत. अखिलेश यादव आता आमदार म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय राहणार आहेत.आता अखिलेश यादव विधानसभेचे सदस्य असताना विरोधकांची भूमिका ठामपणे पार पाडणार आहेत.

अखिलेश यादव यांच्यानंतर रामपूरचे खासदार आझम खान यांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत करहल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा 67,504 मतांच्या फरकाने पराभव केला.

Team Global News Marathi: