कंगनाच्या अडचणी अधिक वाढणार, TMC च्या प्रवक्त्याने तिच्या विरोधात दाखल केली तक्रार

अभिनेत्री कंगना राणावत सतत वादग्रस्त वक्तव्य करत नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाष्य करत जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले होते. मात्र आता कंगनाने ममता दीदींवर केलेल्या टीकेविरोधात तिच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी ट्विट करून दिली आहे, रिजू यांनी आपल्या एफआयआरची एक प्रत ट्विटरवरही शेअर केली आहे. तक्रारीची कॉपी शेअर करण्याबरोबरच त्यांनी लिहिले की, ‘मी कंगना रनौत यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. कारण ती बंगालमध्ये जातीय हिंसा भडकवण्याबद्दल द्वेष पसरवत आहे आणि त्याचवेळी ममता बॅनर्जी यांची प्रतिमा खराब करत आहे.’ रिजू यांनी तक्रारीतही कंगना रनौत यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून कंगना टीएमसीविरोधात विविध प्रकारचे ट्विट करत होती. भाजपला पाठिंबा देत कंगना उघडपणे टीएमसीवर निशाणा साधत होते. गँगरेपचा आरोप करत कंगनाने टीएमसीविरोधात ट्वीट केले होते, त्यानंतर ट्विटरने तिचे खाते निलंबित केले गेले होते. कंगनाचे खाते आता कायमचे निलंबित करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: