दोन ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला, व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा घटनास्थानी रवाना |

 

जम्मू | जम्मू विमानतळाच्या तांत्रिक भागात झालेल्या दोन शक्तीशाली स्फोटाबाबत भारतीय वायुसेनेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून हे दोन्ही स्फोट ड्रोनच्या सहाय्याने केल्याचे स्पष्ट केले आहे. या हल्ल्याने संपूर्ण सरंक्षण दलात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तातडीने व्हाईस एअर चीफ मार्शल एच. आर. अरोरा हे जम्मूकडे रवाना झाले आहेत.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जम्मू हवाई दलाच्या स्थानकाच्या तांत्रिक क्षेत्रात रविवारी पहाटे दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाल्याची माहिती दिली. या स्फोटापैकी एका स्फोटामुळे एका इमारतीच्या छताला किरकोळ नुकसान झाले तर दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला आहे. या दोन्ही स्फोटात कोणत्याही उपकरणांचे नुकसान झाले नाही. स्फोटात कोणत्याही विमानांचे नुकसान झाले नाही, अशी माहिती दिली आहे.

तसेच स्थानिक पोलिसांच्या समवेत याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.रविवारी पहाटे पावणे दोन वाजता जम्मू विमानतळावरील तांत्रिक विभागात दोन मोठे स्फोट झाले. हा हल्ला ड्रोनमार्फत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लडाखच्या दौर्‍यावर असणारे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली आहे.

 

Team Global News Marathi: