पुढील ३० ते ४० वर्षे भाजपाचा काळ – अमित शहांचा विश्वास

पुढील ३० ते ४० वर्षे भाजपाचा काळ – अमित शहांचा विश्वास

मुंबई : देशाच्या राजकारणासाठी घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हे मोठे शाप आहेत, हेच देशातील समस्यांना कारणीभूत आहे. म्हणून पुढील ३० ते ४० वर्षे देशात भाजपाचा काळ आहे. या काळात भारत हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

दक्षिणेत भाजपाची विजयी घौडदौड होणार

तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजपा घराणेशाही संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल. २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजपा या राज्यांमध्ये मात्र सत्तेत नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचे शहा म्हणाले. यामध्ये दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाफीया जाफरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

याचिकेत गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ लोकांना एसआयटीने दिलेल्या क्लिन चीटला आव्हान देण्यात आले होते. मोदी यांनी दंगलीमध्ये आपल्या कथित भूमिकेबाबत एसआयटी तपासाचा सामना केला होता आणि संविधानावर आपला विश्वास कायम ठेवला होता, असे शहा म्हणाले.

राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत शहा म्हणाले की, दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी निषेध करून ‘नाटक’ केले. तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप घराणेशाहीचा पराभव करेल आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि पक्षाची स्थिती कमकुवत असलेल्या सर्व राज्यांमध्ये सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या विकासाची पुढची फेरी दक्षिण भारतातून येईल अशी “सामूहिक आशा” बैठकीत असल्याचे शहा म्हणाले. अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की हे निकाल विकासाच्या राजकारणावर आणि चांगल्या कामगिरीवर लोकांचा शिक्का दर्शवतात.

ग्लोबल न्युज नेटवर्क: