भाजपचा पब्लिसिटी स्टन्ड काही सुटेना, मोदी यांचे फोटो असलेले ‘नमो ऑक्सिजन आयुर्वेदिक बुस्टर’चे केले वाटप !

गुजरात : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवले असताना तसेच अनेकांना कोरोनाच्या संसर्गामध्ये आपला प्राणही गमवावा लागलेला असतानाही भारतीय जनता पक्ष मात्र आपल्या पक्षाच्या आणि पंतप्रधान मोदी यांच्या जाहिरावाजीमध्ये व्यस्त आहेत. त्यातच गुजरातमधील सुरतमध्ये करोनाच्या संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. आज अनेकांना आपला प्राणही गमवावा लागत आहे. ही बातमी ताजी असतांनाच भाजपा नेते स्वत:ची आणि पक्षाची लोकप्रियता वाढवण्यावर भर देत असल्याची बातमी समोर येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल फोटो सुरत येथे भाजपकडून कापूर-ओवा-लवंगीचे मिश्रण असलेल्या आयुर्वेदिक औषधाच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, भारतीय जनता पक्षाचे प्रचार चिन्ह, प्रदेशाध्यक्षांचे नाव आणि ‘नमो ऑक्सिजन आयुर्वेदिक बुस्टर’ अशा नावासह दिले जात आहे. एकीकडे लोक कोरोनामुळे मारत असताना दुसरीकडे मात्र या संकटही भाजपा आपल्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यास असल्याचे पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, खिल्ली उडवली जात आहे.

तसेच गुजरात येथे अमरेली भाजपाचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं २५ बेड्सचे कोविड सेंटर उभारले. त्यात जिल्हा रुग्णालयाकडून पाठवलेले रुग्णांचे उपचार केले जातात. मात्र यांनी ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चा फोटो लावून त्याचा पुरवठा सुरू केला. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे त्यामुळे सोशलवर सध्या या फोटोवरून भाजप पक्षावर टीका केली गेली.

Team Global News Marathi: