भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी, संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी, संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉपमधून तब्बल ३७ लाख ८४ हजारांचे कारखान्याचे साहित्य चोरी केल्याची तक्रार परळी ग्रामिण पोलिसांत २२ डिसेंबर रोजी देण्यात आली होती.

परळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. या चोरी प्रकरणात अखेर परळी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे.

या गोडाऊनमध्ये १७ ऑक्टोबर २०२० ला चोरी झाली. त्याची माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, याबाबत कारखाना प्रशासनाकडून २२ डिसेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: