Big Breaking ! उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

ग्लोबल न्यूज – पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिली आहे. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती. मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 (फेमा) कायद्याअंतर्गत ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

 

अविनाश भोसले यांचे बांधकाम क्षेत्रामध्ये मोठं नाव असून, कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: