बिग ब्रेकिंग: अखेर अनिल देशमुखांना रात्री उशिरा अटक, ईडीची कारवाई

अखेर अनिल देशमुखांना अटक, ईडीची कारवाई

Ex-Maharashtra home minister Anil Deshmukh arrested by ED in money laundering case

मुंबईः खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांना मंगळवार २ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी कोर्टात हजर केले जाईल. चौकशीसाठी ईडी अनिल देशमुख यांचा रिमांड मागण्याची शक्यता आहे.

याआधी सोमवारी सकाळी ईडीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अनिल देशमुख हजर झाले. सतत मीडियासमोर राहणारे देशमुख वारंवार समन्स बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणे टाळत होते. ईडीने शोधून अटक करण्याची तयारी सुरू केली आणि अनिल देशमुख हजर झाले. तब्बल १२ तास त्यांची चौकशी झाली. चौकशीत देशमुख यांच्याकडून अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. अखेर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली.

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता.

मुंबईतील ईडीचे अधिकारी सकाळी 11.30 वाजल्यापासून अनिल देशमुखांची चौकशी करत होते. देशमुखांसोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात आल्याचे कळताच दिल्लीच्या मुख्यालयात मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक दिल्लीहून ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबईत दाखल झाले आणि सारी सूत्रे वेगाने फिरली.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: