नव्या संसद भवनाचे 10 डिसेंबर ला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

नव्या संसद भवनाचे 10 डिसेंबर ला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्या इमारतीचे १० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता भूमीपूजन करणार आहेत, अशी माहिती लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. भारताचा ७५वा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे तर देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण होतील. सरकारचा प्रयत्न २०२१चे अधिवेशन नव्या संसदेत घेण्याचा आहे, त्यादृष्टीने नियोजन करुन बांधकाम केले जाणार आहे.

येत्या 10 डिसेंबरला नव्या भव्य संसद भवनाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडण्याचा निर्णय सत्ताधारी एनडीएने घेतला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी स्वतः पंतप्रधान निवासात जाऊन पंतप्रधान मोदी यांना पायाभरणी समारंभाचे निमंत्रण दिले आहे. येत्या गुरुवारी दुपारी 1 वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे 888 जागा उपलब्ध असती, तर राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील.

केंद्राचा नवा सेंट्रल विस्टा प्रकल्प

राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट परिसरात नव्या इमारतींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प
केंद्रीय सचिवालयासाठी 10 नव्या इमारतींची होणार उभारणी
जुने संसद भवन तोडणार नाही. इंडिया गेट, राष्ट्रीय अभिलेखागार इमारती तशाच ठेवणार
जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत 17,000 स्क्वेअर फूट मोठी असेल.

टाटा उभारणार नवे भव्यदिव्य संसद भवन

त्रिकोणी आकारातील नवे संसद भवन सध्याच्या भवनाच्या जागेतच उभारले जाणार आहे. त्यासाठी 861.90 ते 922 कोटी रुपयांचा खर्च येणार असा अंदाज होता, पण तो खर्च आता 971 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या भव्यदिव्य संसद भवनाची उभारणी टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड करणार आहे. सध्याचे संसद भवन इंग्रज राजवटीत उभारण्यात आले होते. यातील महात्मा गांधी यांच्या भव्य पुतळ्यामुळे या भवनाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: