‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेच्या गदारोळावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

 

फोन टँपिंग प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी राज्यांना आरक्षणाचा अधिकार देणारे विधेयक राज्यसभेत पारित झाले. त्यावेळी राज्यसभेत ६ तास चर्चा झाली आणि अखेर गोंधळाच्या स्थितीत विधेयक मंजुर झाले. त्यानंतर राज्यसभेत साधारण विमा दुरूस्ती विधेयक मांडले गेले. त्यावेळी खासदारांनी पुन्हा राडा सुरू केला.

खासदारांनी गोंधळ घातल्यानंतर राज्यसभेत मार्शलांना बोलवण्यात आलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आणि मार्शलांनी खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर राज्यसभेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राज्यसभेत झालेल्या या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर खासदारांनी सभापतींच्या आसनाजवळ जाऊन कागदपत्रे उधळली.

राज्यसभेत गदारोळानंतर विरोध पक्षातील खासदारांनी गंभीर आरोप केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावला असल्याचा आरोप केला आहे. तर ही संसदीय लोकशाही आहे का?, असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारला. तर राज्यसभेतून बाहेर येताना मार्शलांनी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: