बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

सिंधुदुर्ग: बाळासाहेबांच्या सर्व वचनांना काशीत बुडवून शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गानं चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(amit shah) यांनी केलं आहे.

त्यामुळे भाजपने आता राज्यातील महाविकास आघाडी विरोधात अधिक आक्रमक होण्याचा पवित्रा घेतल्याचं बोललं जात आहे. (amit shah slams uddhav thackeray over CM post promised)

अमित शहा यांच्या हस्ते भाजप नेते नारायण राणे यांच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांना ललकारले. तसेच आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचंही शहा यांनी तब्बल दीड वर्षानंतर जाहीरपणे स्पष्ट केलं. या शिवाय राज्यातील ठाकरे सरकार हे लालची सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली

शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली.

“बंद खोलीत नव्हे, मी खुलेआम वचन देतो”
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेयांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरेयांच्यावर यावेळी थेट टीका केली. “शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो”, असं अमित शहा म्हणाले.

उद्धवजी, आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं म्हणता, मग निवडणुकीतील प्रत्येक भाषणात आम्ही राज्यातील एनडीएच्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करणार असल्याचं आम्ही सांगायचो. तेव्हा विरोध का केला नाही. तुमच्या समोरच मी आणि मोदींनीही फडणवीसच राज्याचं नेतृत्व करतील असं अनेकदा सांगितलं. तेव्हा तुम्ही त्याला आक्षेप का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला.

तीन पायांची ऑटो रिक्षा

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवरही शहा यांनी पहिल्यांदाच टीका केली. तीन पायाच्या ऑटो रिक्षासारखं हे सरकार आहे. या रिक्षाला चौथं चाक नाही. पण तिन्ही चाकं तिन्ही दिशेने जात आहे. त्याचं कारण म्हणजे पवित्र जनादेश नाकारून हे सरकार सत्तेत आलं आहे. जनतेने सरकार बनविण्यासाठी भाजप-शिवसेनेनेला जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने हा जनादेश नाकारला, अशी टीका शहा यांनी केली. (amit shah slams uddhav thackeray over CM post promised)

राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी

कोकणात वादळ आलं. मुख्यमंत्री या भागात किती वेळा आले. एकदाही नाही. पण देवेंद्र फडणवीस तीन वेळा आले. त्यांच्याकडून मी वादळाची माहिती घेत होतो. त्यांनी काजूच्या बागांनाही भेटी दिल्या. आमची जनतेशी बांधिलकी आहे. पण या सरकारची ती राहिली नाही. हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 75 टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यात तीन पक्षाची आघाडी असूनही हा कौल मिळाला आहे. त्यावरून जनता कुणाच्या पाठी आहे हे दिसून येतं, असंही ते म्हणाले. (amit shah slams uddhav thackeray over CM post promised)

ग्लोबल न्युज नेटवर्क: