शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे – अमित शहा

भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचे आज गृहमंती अमित शहा यांच्या हस्ते उदघाटन झाले यावेळी शहा यांनी जोरदार फटकेबाजी करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदावर सुद्धा भाष्य केले होते. त्यामुळे अमित शहांच्या या कोकण दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

अमित शहा म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळासाहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली. त्यामुळे भाजपाने आता राज्यातील महाविकास आघाडी विरोधात अधिक आक्रमक होण्याचा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

यावेळी अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांना डिवचले. तसेच आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कोणतंही आश्वासन दिले नसल्याचेही शहा यांनी तब्बल दीड वर्षानंतर जाहीरपणे स्पष्ट केले. या शिवाय राज्यातील ठाकरे सरकार हे लालची सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.

Team Global News Marathi: