ऑटोरिक्षावाल्याचे नशीब फिरले, रातोरात २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकला

 

केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाला रातोरात लॉटरी लागली आहे. थोडी थोडकी नाही तर थेट २५ कोटींची लॉटरी या रिक्षा चालकाला लागली आहे.त्याचाही यावर विश्वास बसत नाहीय. ओनम सणामध्ये ओनम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात तो जिंकला आहे. श्रीवराहमच्या अनुप याला ही लॉटरी लागली आहे.

ऑटो रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणे कठीण बनले होते. यामुळे तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता. त्यासाठी त्याने एक दिवस आधीच तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच त्याचे नशीब बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला.

शनिवारी त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकिट त्याची पहिली पसंत नव्हते, त्याच तिकिटाने अनुपला छप्परफाड पैसा दिला आहे. ही लॉटरी लागल्यानंतर त्याने मलेशियाला जायची आता गरज उरली नाही, असे सांगितले आहे. पहिले तिकीट त्याला आवडले नव्हते, म्हणून त्याने दुसरे तिकिट खरेदी केले, या दुसऱ्या तिकिटाने त्याला जिंकवले आहे. आता मला कर्ज घेण्याची गरज नाही, तसेच मलेशियालाही जायची गरज नाही असे तो म्हणाला.

तो गेल्या २२ वर्षांपासून या लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता. या काळता त्याला आतापर्यंत काहीशे रुपयांपासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये मिळाले होते. “मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहिला नाही. पण जेव्हा मी माझा फोन पाहिला तेव्हा मला समजले की मी जिंकलो. माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी तो मेसेज माझ्या पत्नीला दाखविला.” असे तो म्हणाला.

Team Global News Marathi: