नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला, ४०० जणांवर गुन्हा, २० अटकेतओ

नांदेड : कोरोना संकट वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन केले होते. मात्र शीख समुदायाने नांदेडमध्ये जंगी मिरवणूक काढली. यावेळी प्रचंड गर्दी होती. अनेकांनी मास्क घातले नव्हते. कोविड प्रोटोकॉलचे उघडपणे उल्लंघन सुरू होते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलीस आणि नागरिक यांच्यातील चर्चा सुरू असताना अचानक हिंसा सुरू झाली. काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस जखमी झाल्याचे बघून सहकारी पोलिसांनी मिरवणुकीच्या नावाखाली कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर लाठीमार केला. लाठ्या उगारणाऱ्या पोलिसांवर मोठ्या जमावाने ऑएकदम हल्ला केला. यातून आणखी हिंसा भडकली. शीख समुदाय आणि पोलीस यांच्यातील संघर्षात चार पोलीस जखमी झाले.

होळीच्या दिवशी नांदेडमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आणि २० जणांना अटक केली. जखमी पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. या प्रकरणात आणखी धरपकडीची शक्यता आहे. हिंसा प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अटक केलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नांदेडमधील हिंसेप्रकरणी ज्या ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी किमान ६० जणांवर याआधीही गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मुद्दाम गडबड करण्याच्या उद्देशाने मिरवणुकीचे आयोजन झाले होते का याचा तपास सुरू आहे.

हिंसेप्रकरणी तातडीने पोलीस कारवाई सुरू झाल्यामुळे नांदेडमध्ये शांतता निर्माण झाली. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलीस संबबंधितांना लगेच थांबवून चौकशी करत आहेत. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तसेच कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई होत आहे. ज्या ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्या सर्वांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत २० जणांना अटक केली असून लवकरच अनेकांना अटक करू, असे स्पष्ट संकेत पोलिसांनी दिले आहेत.

300 ते 400 जण हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले

काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास शीख समुदायाचा नियोजित कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम सुरु असताना निशान साहेब गेट नंबर १ पर्यंत आलं. पण बाहेर काढण्यावरुन त्यांच्यात आपसात वाद झाला. आणि ३०० ते ४००  जण हल्लाबोलच्या तयारीने गेट तोडून बाहेर आले. त्यांनी पारंपरिक मार्गाने हल्लाबोल केला. यामध्ये चार पोलीस कर्मचारी गंभीर झाले आहेत. तसेच सदर समुदायाकडून गाड्याची तोडफोड देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. ज्यामध्ये सरकारी मालमत्तेचं देखील मोठ नुकसान झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते

नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येते. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर्षी या कार्यक्रमाला परवानगी पोलिसांनी नाकारली  होती. पोलिसांनी परवानगी दिली नसताना देखील नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले.  तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा कार्यक्रम करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: