कार्यक्रमाच्या फलकावर नाव नाही म्हणून भाजपा आमदाराने चक्क पूजेच्या आसनाला मारली लाथ

कार्यक्रमाच्या फलकावर नाव नाही म्हणून भाजपा आमदाराने चक्क पूजेच्या आसनाला मारली लाथ

‘सत्ता आणि सत्तेची हवा’ अशीच काहीशी अवस्था भाजपा नेत्याची झालेली आहे. आज भाजपा नेत्यांची येत असलेली संतप्त वक्तव्ये आणि समाजामध्ये वर्तणूक त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेश येथे घडला आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आमदाराविरोधात राग व्यक्त केला आहे.

 

भाजपा आमदार रमेश चंद्र मिश्रा यांचे नाव भूमिपूजन फलकावर न दिसल्याने आमदार रमेश चंद्र मिश्रा प्रचंड संतप्त झाले होते. फलकावर आपले नाव नाहीय तसेच आपल्याला कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही, हे समजल्यानंतर रमेश चंद्र मिश्रा यांनी कार्यक्रमात जोरदार गोंधळ घातला.

मिश्रा यांनी आरडा-ओरड करत पूजेसाठी बसण्याची आसनं लाथेने उडवली. ते बदलापूरचे आमदार आहेत. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात हा विधानसभा मतदारसंघ येतो. बालुआ गावात ही घटना घडली. आमदार रमेश चंद्र मिश्रा गोंधळ घालत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रमेश चंद्र मिश्रा कार्यक्रमस्थळी येऊन, लोकांना दाटवणीच्या स्वरात इथे काय चालू आहे? अशी विचारणा करताना दिसतात या प्रकारामुळे पुन्हा एकदा योगी सरकारवर जनतेचा रोष ओढवला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: