भाजपच्या कार्यालयात ईडी आणि सीबीआयची कार्यालये शिफ्ट करावी – सचिन सावंत

भाजपच्या कार्यालयात ईडी आणि सीबीआयची कार्यालये शिफ्ट करावी – सचिन सावंत

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटिस धाडण्यात आलेली आहे. खात्रीदायक सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार २९ तारखेला वर्षा संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

यावर बोलताना सावंत म्हणाले की, भाजपची जी आलिशान कार्यालये आहेत, त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावीत. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपाच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधक आहेत म्हणून जुने प्रकरण उगाळून काढून केवळ त्रास दिला जात आहे. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावे, अशी टीका सावंत यांनी केली होती.

तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मेल यांनी सुद्धा भाजपावर टीकास्त्र सोडले होते. ‘महाराष्ट्रासाठी ईडीचा हा खेळ नवा नाही. भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. यातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे मलिक म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: