गुजरातमध्ये खाणीतून काढलेला 60 लाख टन कोळसा रस्त्यातून गायब

 

गुजरात | गुजरात राज्य सध्या घोटाळ्यांमुळे चांगलेच चर्चेत रहात असून आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये पाच ते सहा हजार कोटींचा कोळसा घोटाळा उघडकीस आला आहे. कोल इंडियाच्या खाणींमधून काढलेला कोळसा ज्या उद्योगापर्यंत पोहोचवायचा होता तिथपर्यंत गेलाच नाही. तब्बल 60 लाख टन कोळसा रस्त्यातूनच गायब केला.

सदर कोळसा घोटाळ्यात भ्रष्टाचारात गुजरात सरकारमधील अनेक अधिकारी आणि बोगस एजन्सींचा समावेश आहे. गुजरातमधील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा पर्दाफाश ‘दैनिक भास्कर’ने केला आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा घोटाळा सुरू असताना आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आला नाही हे धक्कादायक आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या घोटाळय़ात गुजरात सरकारमधील काही अधिकारी आणि बोगस इजन्सींचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर पेंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल जैन म्हणाले, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीना कोळसा दिला जातो. त्यानंतर आमची भूमिका पूर्ण होते. कोल इंडियाचे संचालक सत्येंद्र तिवारी यांनी सांगितले, एजन्सी नेमण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या उद्योग विभागाची आहे. यात काही आढळले तर राज्याच्या गृह विभागास बाब निदर्शनास आणून द्यावी असे त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: