अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन म्हणाले की,

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाड पोलिसांनी राणेंना अटक केली होती मात्र सायंकाळी उशिरा त्यांना जमीन मंजूर झाला मिळाला होता मात्र या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चँगलेच तापले होते तर दुसरीकडे अनेक ठिकाणी भाजपा एनी शिवसेना कार्यकर्त्ये एकमेकांना भिडलेले दिसून आले होते. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत निवांत नारायण राणेंना फोन करून विचारपूस केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या विधानाशी सहमती दर्शवली नसली तरी भाजपा राणेंच्या पाठीशी उभा राहील, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाराणय राणेंच्या मागे पक्ष उभा राहील असे सांगितले होते. तसेच नारायण राणेंवरील कारवाईविरोधात भाजपानेही तीव्र आंदोलने केली होती. आता अटकेच्या कारवाईमुळे थांबलेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.

Team Global News Marathi: