किमया शेअर बाजाराची ! एका वर्षात 2000% छप्परफाड रिटर्न; एक लाखाचे झाले 23 लाख

 

किमया शेअर बाजाराची ! एका वर्षात 2000% छप्परफाड रिटर्न; एक लाखाचे झाले 23 लाख

मुंबई : शेअर बाजार म्हटला तर जोखीम ही आलीच, हात लावताच मातीचंही सोनं होतं किंवा सोन्याचीही माती होऊ शकते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक खुपच सावधानतेने करायला हवी. अनेक स्टॉक असे आहेत की, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. असाच एक स्टॉक म्हणजेच GRM Overseas होय.

या स्मॉल-कॅप राइस मिलिंग कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 34 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढली आहे. या एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना 2,171.78 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 23 लाख रुपये मिळाले असते.

GRM ओव्हरसीज शेअरचा इतिहास
10 वर्षांत, GRM ओव्हरसीजचा शेअर 1.93 वरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना सुमारे 40,450 टक्के परतावा दिला आहे.

 

गेल्या 5 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.49 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे.

या 5 वर्षांच्या कालावधीत हा शेअर सुमारे 17,325 टक्क्यांनी वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हा शेअर 856 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.

गेल्या 6 महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 156 रुपयांवरून 782 च्या पातळीवर गेला आहे. या कालावधीत GRM ओव्हरसीजच्या स्टॉकची किंमत 400 टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 डिसेंबर रोजी तो 504 रुपयांवर होता, जो 277 रुपयांच्या वाढीसह 782 वर व्यवहार करत आहे.

गुंतवणूकदारांना किती नफा झाला ?

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 5 लाख झाले असते.

एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी हा स्टॉक 1.93 च्या पातळीवर विकत घेतला असेल आणि त्यात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर तो आज 4.05 कोटी रुपयांचा मालक झाला असता.

शेअर बाजारातील अभूतपूर्व तेजी

मागील दीड वर्ष शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच ग्लोबल न्यूज मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: