काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनाने निधन, मुलाने ट्वीट करून दिली माहिती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनाने निधन, मुलाने ट्वीट करून दिली माहिती

 

दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे साडे तीन वाजता निधन झालं. त्यांचे सुपुत्र फैजल पटेल यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. फैजल यांनी ट्वीट केलेल्या निवेदनात, लोकाना कोरोना गाइडलाइन्स पाळायचं आवाहनही केलंय.

अहमद पटेल यांनी महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यामुळे १५ नोव्हेंबरला त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तिथं त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांवर दुष्परिणाम होऊ लागला. १८ नोव्हेंबरला त्यांच्या मुलीनं ट्वीट तरून प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याची माहितीही दिली होती.

बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं ट्वीट मुलगा फैजल यांनी केलं. त्यात त्यांनी लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं,गर्दी टाळण्याचं, कोरोनासाठीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: