कृषी कायद्याविरोधात आता भाजपाचा ‘हा’ खासदार देणार लवकरच राजीनामा

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात प्रजासत्ताक दिनी घडलेल्या प्रकरणावरून संपूर्ण जगभराचे लक्ष या आंदोलनाने आपल्याकडे खेचून घेतले आहे. तसेच या आंदोलन संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

त्यातच आता भाजपाचा एक खासदार या केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोध लवकरच राजीनामा देणार असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. मात्र या खासदाराचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. तसेच भाजपाचे जेवढे खासदार आहेत तेवढे दिवस शेतकरी आंदोलन चालेल, असा दावाही राकेश टिकैत यांनी केला.

राकेश टिकैत यांनी केलेल्या दाव्यानंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. कृषी कायद्यांना विरोध करत राजीनामा देण्याची तयारी करणारा भाजपाचा खासदार कोण याबाबतची चांगलीच चर्चा रंगली आहे. पश्चिम उत्तर प्रदेश भागातील भाजपाचा कुठलातरी खासदार कृषी कायद्यांना विरोध करत राजीनामा देईल, असा अंदाज आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या मते राजीनाम्यांची सुरुवात ही पंजाब-किंवा हरियाणामधून होईल.

Team Global News Marathi: