संत बाबाराम सिंह यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी यांचा मोदी सरकारला सवाल

संत बाबाराम सिंह यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी यांचा मोदी सरकारला सवाल

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायदायाविरोधात मागच्या २१ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला जमलेले नाही. या आंदोलन दरम्यान एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने सिंधू बॉर्डरवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. तसेच त्यकन्या जवळ मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देऊन आपल्या हक्कासाठी आवाज उत्सवात असल्याचे नमूद केले होते.

या घडलेल्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट केले. “हरयाणाच्या एका संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांची वाईट अवस्था पाहून आत्महत्या केली”. यावेळी राहुल गांधी यांनी संत बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहली आणि केंद्र सरकारला अपील केली की त्यांनी शेती विरोधी कायद्याला परत घ्यावे.

“हरयाणाच्या एका संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांची वाईट अवस्था पाहून आत्महत्या केली. या दुखा:च्या प्रसंगी मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हट्ट सोडा आणि तात्काळ शेती कायदा मागे घ्या” असर ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: