वाढदिवस साजरा करून परतत असताना वाटेतच काळाने घातला घाला भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर । वाढदिवस साजरी करण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्टरला कारने दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर येथे हा अपघात झाला असून, या घटनेत 2 मुलं आणि 2 मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील आहे.

दर्शना उधवाणी (25), प्रगती निमगडे (24), मोहम्मद अमन (23) आणि स्मित पटेल (25) अशी मृतकांची नावं असून, योग गोगरी (23) हा अपघातात जखमी झाला आहे. योग गोगरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे 5 जण मंगळवारी रात्री चंद्रपुर मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेले होते.

रात्री उशिरा परतत असतांना एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, ज्यामध्ये भीषण धडक होऊन 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शहरात शोकाकुल वातावरण आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: