पतीच्या निधनानंतर मायलेकीने संपवलं आयुष्य, सुसाईट नोट आली समोर

 

नाशिक | कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपला जवळचा व्यक्ती गमवावा लागला आहे. काहींनी आपल्या पाटील तर काहींनी आपल्या पालकांना गमावले आहे. त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक उरत समोर येत आहे. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यानंतर एका आईने आपल्या लहान मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुजाता प्रवीण तेजाळे असं सदर आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर अनया असं मुलीचं नाव आहे. सुजाता यांचे पती प्रवीण पंडित तेजाळे यांचं पाच महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. पतीच्या निधनानंतर सुजाता एकट्या पडल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या प्रचंड निराशा आणि अडचणींचा सामना करीत होत्या. ‘आई, पप्पा कधी येतील’ असं अनया सतत आईला विचारल होती. तिच्या या निरास प्रश्नाला सुजाता यांच्याकडे उत्तर नव्हते. अखेर त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीसह गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

सुजाता यांच्या आत्महत्येनंतर घरात एक सुसाईट नोट सापडली आहे. ही सुसाईट नोट वाचून सर्वच जण गहिवरून गेले. सुजाता तेजाळे यांची सुसाईड नोट मी सुजाता प्रवीण तेजाळे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. पत्रास कारण की, माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनात गेले तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखा आहे असं लिहीत त्यांनी आपले जीवन संपवले आहे.

Team Global News Marathi: