आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने महापूजा अर्ध्यातच सोडली

आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने महापूजा अर्ध्यातच सोडली

ग्लोबल न्यूज: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. या पूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या सह-कुटुंब पूजेला हजर होते. मात्र विधिवध पूजा सुरु असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पूजा अर्ध्यातच सोडावी लागली होती.

आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंदिराच्या गाभ्यात महापूजेसाठी बसले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना गुदमरल्यासारखे झाले आणि अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी पूजा अर्धवट सोडली आणि मंदिराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले.

आदित्य ठाकरे अचानक पूजा सोडून बाहेर आल्याने त्यांचे सुरक्षा रक्षकही चक्रावून गेले. त्यांच्या भोवती एकच गराडा पडला. पण त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे कळताच त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यानंतर अर्धातास गाडीत बसल्यावर त्यांना थोडं बरे वाटू लागले. बरं वाटू लागल्यानंतर आदित्य पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात गेले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: