अभिनेत्री रिया चक्रवर्ती भायखळा तुरुंगात रवानगी

अभिनेत्री रिया चक्रवर्ती भायखळा तुरुंगात रवानगी

अभिनेता सुशांत सिह राजपूत अथमहत्या प्रकरणी संशयाच्या भोवतायत सापडलेली त्याची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने रियाचा जमीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे शक्यतो आज किंवा उद्या तिची भायखळा तुरुंगात रवानगी करण्यात येऊ शकते.

अभिनेता सुशांत राजपूत ड्रग्स प्रकरणी रियाला नार्कोटेक्स डिपार्टमेंटने रात्री कोर्टात हजर केलं. यावेळी रियाने जमीनसाठी अर्ज केला मात्र कोर्टाकडून तो फेटाळण्यात आला आहे. . रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी तिची बाजू कोर्टात मांडली.

एनसीबीने रियाची आतापर्यंत अनेक तास चौकशी केलीय. तिची चौकशी पूर्ण झाली आहे. तसेच रियाने कधीच ड्रग्स घेतले नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून तिने ड्रग्स मागवले होते. यामुळे तिला जामीन दिला पाहिजे, असे रियाचे वकली सतीश माने शिंदे म्हणाले. तसेच जामीन मिळाल्यावर रिया चौकशीत पूर्ण सहकार्य करेल, असेही माने शिंदे कोर्टात सांगतिले.

मात्र एनसीबीने तिच्या जामिनाला विरोध केला ही रिया ही अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील आरोपी आहे. जामिनावर तिची सुटका केल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो, एनसीबीने केलेला युक्तिवाद विचारात घेत कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: