मन हेलवणारी घटना! सुट्टीमुळे आजोबांकडे आलेल्या नातीवर काळाचा घाला;करमाळा तालुक्यातील घटना

मन हेलवणारी घटना! सुट्टीमुळे आजोबांकडे आलेल्या नातीवर काळाचा घाला;करमाळा तालुक्यातील घटना

करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झरे फाटा परिसरात एका दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने मागून जोरदार धडक दिली. यात आजोबा व नात ठार झाली आहे. सुट्टीमुळे नात झरे येथे आजोबांकडे आली होती मात्र तिच्यावर व आजोबांवर काळाने घाला घातला. मृत्यू झालेल्यामध्ये नातीचे नाव संजवनी शंकर मिटे (वय १३) व आजोबा हरिभाऊ सोपान गायकवाड (वय ६५) असे आहे.

अपघाताचे प्रथमदर्शनी संतोष गायकवाड म्हणाले, सूत गिरणीचकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ गायकवाड यांचे झरे फाटा परिसरात हॉटेल आहे. हॉटेलकडे आजोबा हरिभाऊ व नातं संजवनी हे लुनाने घरी जात होते. सूत गिरणी परिसरत यु टर्न घेत असताना त्यांच्या गाडीला धडक दिली. करमाळ्याकडून जेऊरकडे जात असलेल्या गाडीने त्यांच्या लुनाला मागून धडक दिली.

त्यानंतर धडक दिलेल्या गाडीच्या चालकानेच त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. संजवनी ही मुलीची मुलगी आहे. ती मुंबईला असते ती झरे येथे आजोबांकडे आली होती. अपघाताची माहिती समजताच महेश विलास मिटे यांनी मदत केली. संजीवनीही लॉकडॉऊनमुळे मुंबईवरून आपल्या आजोबांकडे राहत होती. आजोबा लुना घेऊन हॉटेलकडे निघाले हे नातीने पाहीले तेव्हा संजवीनीने त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरला व आजोबांभरोबर हॉटेलकडे दोघेही गाडीवरती निघाले.

हरिश्चद्र गायकवाड हे नातीला घेऊन जेऊरकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून येणा-या इको ही चारचाकी वाहन क्रमांक एमएच 45/ ए एल 4140 ने पाठीमागून धडक दिली. यावेळी संजीवनी मिटे हिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी हरिश्चद्र गायकवाड यांना करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. दरम्यान महेश विलास मिटे यांनी करमाळा पोलिसांत वाहन चालकाच्या विरोधात याची फिर्याद दिली आहे. यावरून करमाळा पोलिसांत वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: