ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

बार्शी: पोक्सो कायद्यानुसार पीडित असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा फोटो टि्वट करणे उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर बार्शी शहर पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.काल (रविवारी) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

राऊतांच्या टि्वटनंतर भाजपने त्यांच्यावर टीकेच्या झोड उठवली होती. चित्रा वाघ यांनी राऊतांनी तिचा फोटो का व्हायरल केला, असा प्रश्न विचारला होता.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका गावात काही दिवसापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची बोटे छाटल्याचा व तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार असे बार्शी शहर व तालुका पोलीस स्टेशनमधील एकूण चार जण निलंबित झाले होते.
याप्रकरणी विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.

 

खासदार संजय राऊत यांनी या अत्याचाराविषयी फोटोसह १८ मार्चला ट्विट केकेले होते तसेच त्यांच्या फेसबुक अकाऊंट वर ही फोटो आणि मजकूर प्रसिद्ध केला होता . त्यानंतर बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्याची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा नाव न घेता खासदार संजय राऊत यांना दिला. राऊतांनी संबधीत मुलीचा फोटो टि्वट केल्याने तिची ओळख समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे.

नेमक काय आहे प्रकरण

बार्शी येथे एका अल्पवयीन मुलीवर 5 मार्च रोजी अत्याचार करुन दुसऱ्या दिवशी आरोपींनी तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली. संजय राऊतांनी आरोपी मोकाट असल्याचं टि्वट करुन म्हटलं होत.मात्र प्रत्यक्षात त्या आरोपींना पोलिसांनी 6 मार्च रोजीच अटक केले होते. न्यायालयाचे आदेशानुसार ते आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

त्या मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो देखील ट्वीट केला होता. यामुळे अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली अशी तक्रार एका व्यक्तीने बार्शी पोलिसात दिली. त्या तक्रारीवरुन काल (रविवारी) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: