लसीचे उत्पन्न वाढवण्यासाठी ३ हजार कोटीची गरज, अदर पूनावाला यांची माहिती

पुणे : सध्या संपूर्ण देशभरात युद्ध पातळीवर कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. त्यात संपूर्ण देशभरातून नाही तर जगभरातून कोरोना लसीची मागणी वाढलेली आहे. त्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यास अनेकांकडून विचारणा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोविशील्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचेउत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटी रूपयांची गरज आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी संस्थेचे प्रमुख अदार पूनावाला यांनी परवडणाऱ्या दरात सुरूवातील १०० दशलक्ष डोस देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. ‘कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसंच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते,’ असं अदर पूनावाला म्हणाले.

आम्ही भारतीय बाजारात लस जवळपास १५० ते १६० रूपयांमध्ये सप्लाय करत आहोत. जेव्हा ही लस तयार करण्याचा खर्च हा जवळपास २० डॉलर्स (अंदाजे १५०० रूपये) आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या म्हणण्यावरून कमी दरात ही लस उपलब्ध करून देत आहोत. असं नाहीये की आम्ही नफा कमवत नाही. परंतु आम्हाला अधिक नफा होत नाही जो पुन्हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे असे त्यांनी बोलून दाखविले आहे.

Team Global News Marathi: