कळंब शहर व तालूक्यात 27 कोरोना पॉझिटिव्ह-नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष ही पॉझिटिव्ह

कळंब (उस्मानाबाद) : कळंब तालूक्यात ग्रामीण भागासह शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, पती सागर मुंडे आणि उपनगराध्यक्ष संजय मुंदडा याना कोरोनची लागण झाली आहे. रॅपिड टेस्ट मध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले. सोशल मीडीयावर याबाबत माहिती त्यांनी जाहीर केले आहे. तर संपर्कातील व्यक्तींनी आपली टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

तालुक्यात गुरुवार (ता.६) २७ व्यक्तींना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील मस्सा (खं) येथे पूर्वीच्या कोरोना बधितांच्या संपर्कातील ८, शहरातील सराफ गल्लीतील १, येरमळा ८, शहरातील धोकटे गल्लीतील १, शहरातील नव्याने ५ , रत्नापुर येथे १, येरमळ्यातील येडेश्वरी व्यसनमुक्ती केंद्रातील १ आणि डिकसळ येथे २ असे ऐकून २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

नगराध्यक्षा त्यांचे पती आणि उपनगराध्यक्ष यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. संपर्कातील व्यक्तीचे धाबे दणाणले आहेत. 


तालुक्यातील मस्सा येथील अवैध दारू विक्रेत्यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तब्बल आठ रुग्ण वाढले असून येरमळा येथेही रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरातील नागरिकांची आता धाकधूक वाढली आहे. शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे शहरात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: