15 जूनला आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्यात घेणार रामलल्लाचे दर्शन घेणार!

 

उत्तरप्रदेश | शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्या दौऱयावर जाणार असून शेकडो शिवसैनिकांसह ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. संध्याकाळी ते शरयू नदीची महाआरतीही करतील. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज अयोध्येत आले होते. महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. आदित्य ठाकरे यांच्या दौऱयाबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत आणि शिंदे या दोघांनीही कानपूर प्रकरण, राज्यसभा निवडणूक यावर प्रतिक्रिया दिली. कश्मीरातील हिंदू पंडितांचे दहशतवादी शिरकाण करत असताना काही भाजप नेते मात्र या घटना ‘किरकोळ’ असल्याची टिप्पणी करीत आहेत. हा हिंदूंच्या वीरमरणाचा अपमान असल्याचे संजय राऊत म्हणाले. आतापर्यंत 27 जण मारले गेले आहेत. त्यात 17 पोलीस कर्मचारीही आहेत. मुस्लिम नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत आणि पाच हजार पंडितांनी कश्मीर सोडले आहे. हा प्रकार ‘किरकोळ’ कसा म्हणता येईल, असा सवालही त्यांनी विचारला.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निश्चित विजयी होतील, असे एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले. अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. ते नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून 10 जूनला निर्णय होईल आणि आम्हीच विजयी होऊ, असे शिंदे म्हणाले.

Team Global News Marathi: